Fake News: भारतातील निवडणुकीदरम्यान फेक न्यूज कशी रोखणार? अमेरिकन खासदाराचा सोशल मीडिया कंपन्यांना सवाल

Loksabha Election: “तुमच्या प्लॅटफॉर्मवर निवडणुकीसाठी निर्माण होणारे धोके नवीन नाहीत. यूजर्सनी मागील काळात डीपफेक आणि छेडछाड केलेला कन्टेट मोठ्या प्रमाणावर पसरवला होता," असे बेनेट यांनी लिहिले आहे.
Loksabha Election|Michael Bennet
Loksabha Election|Michael BennetEsakal

भारतात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. निवडणुकीच्या तारखा आज (शनिवारी) दुपारी ३ वाजता जाहीर होणार आहेत. यासोबतच देशभरात आचारसंहिताही लागू होणार आहे.

दरम्यान या सगळ्यात एका अमेरिकन खासदाराने सोशल मीडिया कंपन्यांना सवाल केला आहे की, भारतात होणाऱ्या निवडणुकांसाठी त्यांनी काय तयारी केली आहे.

मेटा-मालकीच्या WhatsApp या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अफवा आणि चुकीची माहिती पसरवण्याचा मोठा इतिहास आहे. हे पाहता अमेरिकन खासदार मायकेल बेनेट यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

अमेरिकेतील निवडणुकांवर लक्ष ठेवणाऱ्या सिनेट इंटेलिजन्स अँड रुल्स कमिटीचे सदस्य असलेल्या खासदार मायकल बेनेट यांनी सोशल मीडिया कंपन्यांना पत्र लिहिले आहे.

हे पत्र Alphabet, Meta, TikTok आणि X ला लिहिले आहे. या कंपन्यांकडून भारतासह विविध देशांतील निवडणुकीच्या तयारीची माहिती मागवण्यात आली आहे.

“तुमच्या प्लॅटफॉर्मवर निवडणुकीसाठी निर्माण होणारे धोके नवीन नाहीत. यूजर्सनी मागील काळात डीपफेक आणि छेडछाड केलेला कन्टेट मोठ्या प्रमाणावर पसरवला होता," असे बेनेट यांनी पत्राच्या सुरुवातील लिहिले आहे.

पत्रात ते पुढे म्हणाले, "आता, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल लोकशाही प्रक्रिया आणि राजकीय स्थिरता या दोन्हींची जोखीम वाढवणार आहेत. अत्याधुनिक AI साधनांच्या प्रसारामुळे कोणालाही सहजपणे खोटी छायाचित्रे प्रतिमा, व्हिडिओ आणि ऑडिओ तयार करणे सोपे झाले आहे.”

Loksabha Election|Michael Bennet
Bharat Jodo: राहुल गांधींच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज; होणार जोरदार शक्तीप्रदर्शन

यावर्षी ७० हून अधिक देशांमध्ये निवडणुका होत आहेत. यासाठी दोन अब्जाहून अधिक लोक मतदान करणार आहेत.

निवडणूक होत असलेल्या देशांमध्ये भारत, अमेरिका,ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, क्रोएशिया, फिनलंड, घाना, आइसलँड, लिथुआनिया, नामिबिया, मेक्सिको, मोल्दोव्हा, मंगोलिया, पनामा, रोमानिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका, युनायटेड किंगडम यांचा समावेश आहे.

Loksabha Election|Michael Bennet
Viral Video: समुद्री चाचांना भारतीय नौदलाचा हिसका, बांगलादेशी जहाजासह 23 लोकांची सुटका

बेनेट यांनी एक्सचे एलोन मस्क, मेटाचे मार्क झुकरबर्ग, टिकटॉकचे शॉ जी च्यु आणि अल्फाबेटचे सुंदर पिचाई यांना पत्रे लिहिली आहेत. त्यांनी या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची निवडणूक-संबंधित धोरणे, कन्टेनट नियंत्रण पथकासह AI निर्मीत कन्टेट ओळखण्यासाठी वापरत असलेल्या साधनांबद्दल माहितीची विनंती केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com