
राजस्थानची राजधानी जयपूरात एक धक्कादायक डिझेल चोरीचा प्रकार समोर आला आहे. जावई आणि मेव्हण्याने यांनी मिळून हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या भूमिगत पाइपलाइनमधून करोडोंचे डिझेल चोरी केले. यासाठी त्यांनी बगरू परिसरात भाड्याने घेतलेल्या घरात 25 फूट लांबीचा बोगदा खोदला. या चोरीचा खुलासा HPCL अधिकाऱ्यांनी पाइपलाइनमधील दाब कमी झाल्याची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर झाला. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर मुख्य आरोपी आणि त्याचा मेव्हणा फरार आहेत.