12th Exam: हेलिकॉप्टरने पोहचल्या बारावीच्या प्रश्नपत्रिका, नक्षलवादी जिल्ह्यातील ३६ विद्यार्थ्यांसाठी घेतली मदत

राज्यातील नक्षलप्रभावित सुकमा जिल्ह्यातील दुर्गम भागात प्रश्नपत्रिका पोचविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली.
Helicopter
Helicoptersakal

सुकमा - छत्तीसगडमध्ये राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. राज्यातील नक्षलप्रभावित सुकमा जिल्ह्यातील दुर्गम भागात प्रश्नपत्रिका पोचविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षाही उद्यापासून (ता.२) सुरू होणार आहेत.

सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा परीक्षा केंद्रावर सलग दुसऱ्या वर्षी हेलिकॉप्टरमधून प्रश्नपत्रिका पोचविण्यात आल्या. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या कार्यालयाने गुरुवारी (ता. २९) रात्री प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे छायाचित्र ‘एक्स’वर पोस्ट करून ही माहिती दिली.

या छायाचित्रासोबत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की हा आमचा छत्तीसगड आहे, जिथे विद्यार्थ्यांच्या भविष्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडात हेलिकॉप्टरमधून प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या. राज्यात बारावीच्या परीक्षांना एक मार्चपासून सुरुवात झाली, असेही नमूद केले आहे.

मुख्यमंत्री साय यांनी सांगितले, की राज्यातील आदिवासी परिसरात विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. चांगल्या शिक्षणापासून कोणीही वंचित राहता कामा नये. मुलांच्या भविष्यासाठी छत्तीसगड सरकर कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

सुकमा जिल्ह्यातील १६ परीक्षा केंद्रांपैकी जागरगुंडा केंद्रावर सुरक्षेच्या कारणामुळे हेलिकॉप्टरमधून प्रश्नपत्रिका नेण्यात आल्या. या केंद्रावर बारावीचे १६ तर दहावीचे २० असे एकूण ३६ विद्यार्थी आहेत. यापूर्वी २०२२-२३ मध्ये जागरगुंडात प्रथमच परीक्षा केंद्र बनविण्यात आले होते.

छत्तीसगडमधील विद्यार्थी

  • इयत्ता बारावी : २.६१ लाख

  • इयत्ता दहावी : ३.४५ लाख

  • एकूण परीक्षा केंद्रे : २,४७५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com