Kerala: केरळात पुन्हा नरबळीचा प्रकार! चिमुकल्यावर जादूटोणा करत हत्येचा प्रयत्न

केरळमध्ये नुकत्याच समोर आलेल्या घटनेत दोन महिलांचं शिर धडापासून वेगळं करण्यात आलं होतं.
black magic
black magic
Updated on

तिरुअनंतपुरम : केरळच्या पथनामथिट्टा येथील नरबळीचं प्रकरण ताजं असताना त्याच जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मलयालपुझ्झा शहरात एका लहान मुलावर काळी जादू करणाऱ्या एका महिला मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे. नागरिकाच्या दक्षतेमुळे त्या मुलाचा जीव वाचला. काळी जादूचा प्रयोग केल्याने मुलगा बेशुद्ध पडला होता. (Human sacrifice again in Kerala attempted murder of a child boy by witchcraft)

black magic
Global News: पर्यावरण बदलामुळं नुकसान झालेल्या गरीब देशांना भरपाई? UNकडे मागणी

शोभना ऊर्फ वसंती असे मांत्रिक महिलेचे नाव आहे. पथानामथिट्टा येथे ही महिला एका मुलाला ताब्यात घेऊन काळी जादूचा प्रयोग करत त्याचा बळी घेण्याच्या प्रयत्नात होती. मात्र नागरिकांनी हा अघोरी प्रकार हाणून पाडला. याप्रकरणी मांत्रिक शोभनाला अटक केली आहे. तिचा साथीदार उन्नीकृष्णन यालाही पकडण्यात आले आहे.

विरोधात बोलल्यास शाप देण्याची धमकी

अलपुझ्झाच्या एका नागरिकाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. दोघांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तंत्र मंत्र सुरू असताना मुलगा बेशुद्ध पडला होता. स्थानिक नागरिकांच्या मते, अनेक दिवसांपासून त्या महिलेने गावकऱ्यांना त्रस्त केले होते. तिच्या विरोधात बोलल्यास शाप देण्याची ती धमकी द्यायची. मांत्रिक शोभनाची चौकशी सुरू आहे. मांत्रिक महिला तांत्रिक कामात मुलांना सहभागी करून घेत होती, असे पोलिसांनी सांगितले.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक महिलेसमोर मुलगा बसलेला दिसतो. मांत्रिक महिला ही काळ्या जादूचा अभ्यास करताना दिसते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्या महिलेच्या घराबाहेर आंदोलन सुरू केले. पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली.

दोन महिलांचं शिर धडापासून केलं होतं वेगळं

केरळमध्ये नुकत्याच समोर आलेल्या घटनेत दोन महिलांचं शिर धडापासून वेगळं करण्यात आलं होतं. कर्जबाजारी असलेल्या पती-पत्नीकडून हा प्रकार करण्यात करण्यात आला होता. पैशांची चिंता संपवण्यासाठी दोन महिलांचा बळी देण्यास त्यांना एका मांत्रिकानं सांगितलं होतं, त्यातूनच हा प्रकार घडला होता. या महिलांच्या हत्येनंतर त्यांच्या शरीराचे बारीक तुकडेही आरोपींनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com