Uttrakhand : AI च्या जगात माणुसकी टिकवणं गरजेचं; राष्ट्रीय जनसंपर्क दिवसानिमित्त डी.ए बनशीधर तिवारी यांनी व्यक्त केलं मत

या कार्यशाळेची थीम रिसपॉन्सिबल यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलीजेंस : रोल ऑफ पब्लिक रिलेशन’’ अशी आहे.
Uttarakhand
Uttarakhandesakal
Updated on

एआयच्या काळातही माणुसकी टिकवणे आवश्यक आहे, आजच्या तांत्रिक युगात, आपल्या सर्वांना आपली जबाबदारी समजून घेणेही महत्त्वाचे असल्याचे मत महानिदेशक सूचना विभागाचे उपाध्यक्ष  एमडी डी.ए बनशीधर तिवारी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय जनसंपर्क दिनाच्या निमित्ताने सोमवारी देहरादुनमधील जनसंपर्क सोसायटीमध्ये एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेची थीम रिसपॉन्सिबल यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलीजेंस : रोल ऑफ पब्लिक रिलेशन’’ अशी आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख अतिथि एम.डी.डी.ए. बंशीधर तिवारी, संयुक्त निदेशक सूचना डॉ. नितिन उपाध्याय, बद्रीकेदार मंदिर समितिचे ट्रस्टी श्री विजय थपलियाल, अध्यक्ष पी.आर.एस.आई. देहरादून रवि विजारनिया यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून झाली.   

आजच्या तांत्रिक युगात आपण आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. ए.आय. तंत्रज्ञान ज्या प्रकारे सध्याच्या काळात वेगाने विकसित होत आहे, मानवतेचा आत्मा सर्वोपरि ठेवण्याची ही आपल्या सर्वांची जबाबदारी बनली आहे.  ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने वेळ वाचतो, आपण त्या वेळेचा कसा वापर करतो हे आपल्या सर्वांना समजले पाहिजे, असे मुख्य अतिथी श्री. बनशीधर तिवारी म्हणाले. उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.

Uttarakhand
Uttrakhand Milk Rate : राज्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर एक रूपया दरवाढ, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com