Nepal Floods: माणुसकीचे दर्शन! कुटुंबाबरोबरच पूरग्रस्तांच्या शोधासाठी प्रयत्न; आप्त हरवले...तरीही इतरांसाठी धडपड

Lost Loved Ones Yet Helping Others In A Flood Rescue Mission: आप्तस्वकीयांना जलप्रलयाने हिरावून नेले तरी नेपाळी नागरिकांनी स्वतःचे दु:ख दडवून अनोळखी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेत माणुसकीचे अद्वितीय उदाहरण घडवले.
Lost Loved Ones Yet Helping Others Family Shows Humanity By Joining Search And Rescue Efforts For Flood Affected People

Lost Loved Ones Yet Helping Others Family Shows Humanity By Joining Search And Rescue Efforts For Flood Affected People

sakal

Updated on

काठमांडू: महापुराने कोणाचा भाऊ हिरावून घेतला, कोणाचे कुटुंबच बेपत्ता झाले. घरातील माणसांचा शोध घेण्याची धडपड सुरू असतानाच आजूबाजूला मदतीसाठी आर्त हाका ऐकू येत होत्या. स्वतःचे दुःख मनात दडवून अनेक वाचलेले नेपाळी नागरिक मात्र त्या हाकांना प्रतिसाद देत मदतकार्यात उतरले आहेत. आपल्या माणसांचा शोध घेतानाच ते अनोळखी जीव वाचवण्यासाठी धावत आहेत. संकटाने त्यांच्याकडून सर्व काही हिरावून घेतले; पण माणुसकी मात्र कायम असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com