esakal | संसर्ग रोखण्यासाठी हवेत दमटपणा आवश्‍यक
sakal

बोलून बातमी शोधा

संसर्ग रोखण्यासाठी हवेत दमटपणा आवश्‍यक

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर राखण्याबरोबरच खोलीतील दमटपणा नियंत्रित करण्याची शिफारसही भारत आणि जर्मनीतील शास्त्रज्ञांच्या पथकाने केली आहे.

संसर्ग रोखण्यासाठी हवेत दमटपणा आवश्‍यक

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर राखण्याबरोबरच खोलीतील दमटपणा नियंत्रित करण्याची शिफारसही भारत आणि जर्मनीतील शास्त्रज्ञांच्या पथकाने केली आहे. रुग्णालय, कार्यालय, सार्वजनिक वाहतूक सेवा अशा अनेक लोकांची उपस्थिती असलेल्या बंदिस्त ठिकाणी दमटपणा योग्य प्रमाणात राखणे अत्यंत आवश्‍यक आहे, असे या पथकाचे म्हणणे आहे. 

या पथकामध्ये दिल्लीतील सीएसआयआर राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेच्या संशोधकांचा समावेश असून त्यांचा अहवाल ‘एअरोसोल अँड एअर क्वालिटी रिसर्च’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, हवेत ४० ते ६० टक्के दमटपणा असल्यास विषाणूचा प्रसार आणि नाकावाटे शरीरात जाण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते. पाच मायक्रोमीटर जाडी असलेले थेंब हवेत नऊ मिनीटांपर्यंत तरंगू शकतात. बोलताना अथवा खोकताना, शिंकताना असे थेंब बाहेर पडतात. अशा वेळी दमट हवेची मोठी भूमिका असते. हवेत दमटणा असल्यास कणांभोवती पाण्याचे अधिक कण जमा होतात आणि त्याची जाडी वाढते. दमटपणा ४० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर बाधित व्यक्तीच्या नाका-तोंडावाटे बाहेर पडलेले कण हलकेच राहतात आणि हवेतून दूरपर्यंत संसर्ग पसरवितात. उत्तर गोलार्धात लवकरच हिवाळा सुरु होऊन अनेक लोक घरांमध्ये थांबतात आणि त्यांच्या घरात कायम हिटर लावलेले असते. त्यामुळे हवा कोरडी होते आणि संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी खोलीत पुरेसा दमटपणा असणे आवश्‍यक आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top