
कोलकात्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका महिलेचे अपघातानंतर शरीर अर्धांगवायूग्रस्त झाले,बिल भरण्यासाठी पैसे नाहीत आणि पत्नीला सांभाळण्यास अकार्यक्षम असल्याचे कारण देत तिच्या पतीने रुग्णालयात सोडून दिले. तब्बल दोन वर्षांपासून ही महिला अपोलो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, पण तिला घरी नेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. न्यायालयाच्या आदेशानंतर Amherst Street पोलीस ठाण्याने महिलेच्या पतीला हजर केले असता, त्याने तिला सांभाळण्यास असमर्थता दर्शवली.