पती म्हणतो, तुला तिसरं मुल झालंच कसं?

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

पती म्हणतोय, पत्नी एक वर्षापासून दुसरीकडे राहात आहे, तिला तिसरे मुल झालेच कसे? तर पत्नी म्हणाली, पती खोटं बोलतोय, हे मुल त्याचेच आहे. अखेर डीएनए चाचणी करण्यात आली.

भोपाळ (मध्य प्रदेश): पती म्हणतोय, पत्नी एक वर्षापासून दुसरीकडे राहात आहे, तिला तिसरे मुल झालेच कसे? तर पत्नी म्हणाली, पती खोटं बोलतोय, हे मुल त्याचेच आहे. अखेर डीएनए चाचणी करण्यात आली.

ग्वाल्हेरमध्ये पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. पत्नीला न्यायालयाच्या आदेशानुसार डीएनए टेस्ट करावी लागली. डीएनए अहवालानुसार महिलेचे तिसरे अपत्य तिच्या पतीपासून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्वाल्हेरमधील कौटुंबिक न्यायालयात एका पतीने पत्नीवर संशय घेत घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटासाठी केलेल्या अर्जाचं कारण देताना तिसऱ्या मूल आपले नसल्याचे म्हटले होते. पत्नी जवळपास एक वर्षापासून दूसऱ्या शहरात राहत असून, मुलाचा जन्म कसा शक्य आहे. तिसरे मुल आपले नसल्याचा आरोप पतीने केला होता.

दरम्यान, न्यायालयात पत्नीला बोलावण्यात आले. पतीचे आरोप फेटाळून लावताना पत्नी पत्नी म्हणाली, 'पती खोटं बोलत असून हे मुल पतीचेच आहे. न्यायालयानं दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले. शेवटी, पतीचा संशय दूर करण्यासाठी न्यायालयाने एक निर्णय घेतला. तिसऱ्या मुलाची आणि पतीची डीएनए टेस्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. डीएनएचा अहवालाचे हाती आल्यानंतर पती खोटे बोलत असल्याचे सिद्ध झालं. डीएनए अहवालानुसार महिलेचे तिसरे अपत्य तिच्या पतीपासून झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, पीडीत महिलेच्या वकीलांनी म्हटले की, पतीने डीएनए चाचणी करून घेतली. त्यात सर्व काही सत्य समोर आले आहे. डीएनए चाचणी पास केल्यानंतरही पती तिला सोबत ठेवण्यास तयार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband doubt on wife apply for divorse family court dna test at bhopal