3 मुलांची आई असणाऱ्या काकीचं पुतण्यासोबत अफेअर; घरातच...

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

तीन मुलांची आई असणाऱ्या महिलेचं पुतण्यासोत अफेअर होते. या महिलेने तिच्या पतीचा खून करून मृतदेह घरातच पुरल्याची घटना मध्यप्रदेशातील देहात पोलिस स्टेशन भागातील खादरगउ घाट पंचायतीच्या परिसरात घडली आहे.

भोपाळ : तीन मुलांची आई असणाऱ्या महिलेचं पुतण्यासोत अफेअर होते. या महिलेने तिच्या पतीचा खून करून मृतदेह घरातच पुरल्याची घटना मध्यप्रदेशातील देहात पोलिस स्टेशन भागातील खादरगउ घाट पंचायतीच्या परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खादरगउ येथे राहणारा मृत गंभीर सिंह हा तीन दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी संध्याकाळी गंभीर याच्याशी अखेरची चर्चा झाल्याचे गंभीर सिंहचे मोठे भाऊ लालसिंह यांनी पोलिसांना सांगितले. तो आपल्या कामावरून गावातील सुनील सिंगसह परत येत आहेत. तेव्हापासून त्याच्याशी बोलणे झालेले नव्हते. त्याचनंतर त्याचा मोबाईल नंबरही बंद होता.

दरम्यान, मृत गंभीर सिंह यांचे बंधू लालसिंह यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. त्यानुसार, पोलिसांनी शोध घेतला पण काही सापडले नाही, त्यानंतर घराच्या आत काही भाग खोदल्यानंतर त्यांना गंभीर सिंहचा मृतदेह सापडला. यानंतर गंभीर सिंहचा मोठा भाऊ लालसिंह यांनी सांगितले की, गंभीर सिंह यांची पत्नी कांताबाई (वय ३०) आणि त्याचा पुतण्या ब्रिजेश (वय २५) यांच्यात प्रेमसंबंध सुरू आहे. हे दोघेही ५ ऑगस्ट रोजी घरातून पळून गेले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना अजूनही यश आलेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband murdered in madhyapradesh body buried in house