तपासाच्या नावाखाली पतीचा मानसिक छळ; भरत कुरणेंच्या पत्नीचा आरोप

संजय सूर्यवंशी
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

बेळगाव : गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक केलेल्या आपल्या पतीला व कुटुंबियांना एसआयटी पथकाकडून नाहक मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आज भरत कुरणेची आई रेखा कुरणे व पत्नी गायत्री कुरणे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

बेळगाव : गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक केलेल्या आपल्या पतीला व कुटुंबियांना एसआयटी पथकाकडून नाहक मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आज भरत कुरणेची आई रेखा कुरणे व पत्नी गायत्री कुरणे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

श्रीमती गायत्री कुरणे म्हणाल्या, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पतीला बंगळूरच्या एसआयटी पथकाने चौकशीसाठी नेत असल्याचे सांगत बंगळूरला नेले. तेथे नेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर सातत्याने बेळगावात त्यांना आणून त्यांच्यासह आपल्या कुटुंबियांनाही मानसिक त्रास दिला. आपले पती सतत आजारी असतात. सध्या देखील त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यातच त्यांना पोलिसांकडून मानसिक त्रास सुरू असल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावली असल्याचे त्यांनी फोनवरून आपल्याला सांगितले. पोलिसांकडून होत असलेल्या छळामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. तपासाच्या नावाखाली पथकाकडून विनाकारण छळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भरत कुरणेची आई रेखा कुरणे म्हणाल्या की, आपला मुलगा भरतला पोलिसांनी अटक केलेच परंतु तपासाच्या नावाखाली आपल्या दुसऱ्या मुलालाही चार-पाच वेळा नेऊन त्याचाही मानसिक छळ चालविला आहे. 
भरत कुरणेचा खटला चालविणारे वकील अॅड. चेतन मणेरीकर म्हणाले की, भरत कुरणेच्या काही वैयक्तिक अडचणी असतील तर ते ऐकण्यासाठीही बंगळूरमध्ये एसआयटी पथकाचे अधिकारी पाच मिनिटांचा खासगी वेळ देत नाही. हे कोणत्या कायद्यात बसते. एसटी पथकाने या घटनेचा तपास करताना निष्पापांना त्रास होऊ नये, याचीही काळजी घ्यावी असे आवाहन अॅड. मणेरीकर यांनी केले.

Web Title: Husband s mental torture in the name of inquiry alleged by wife of bharat kurane