हनिमूनसाठी पती वाट पहात असताना पत्नी...

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

विवाह झाल्यानंतर हनिमूनची तयारी करण्यात आली. पती खोलीमध्ये पत्नीची वाट पाहात बसला. पण, पत्नी अचानक गायब झाली. रात्रभर वाट पाहूनही पत्नी न आल्याने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

वाराणसी (उत्तर प्रदेश): विवाह झाल्यानंतर हनिमूनची तयारी करण्यात आली. पती खोलीमध्ये पत्नीची वाट पाहात बसला. पण, पत्नी अचानक गायब झाली. रात्रभर वाट पाहूनही पत्नी न आल्याने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लल्लापूरा भागातील एका युवतीचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. विवाहानंतर माहेरी गेलेली युवती सासरी आली. सासरी आल्यानंतर कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण होते. कुटुंबातील सर्वांनी एकत्र जेवण केले. हनिमुनसाठी खोली सजवण्यात आली होती. कुटुंबातील इतर सदस्य झोपण्यासाठी गेले. नवराही सजवण्यात आलेल्या खोलीमध्ये गेल्यानंतर पत्नीची वाट पाहू लागला. वेळ पुढे-पुढे जाऊ लागली तरी पत्नी न आल्याने तो खोलीबाहेर आला व इतर सदस्यांकडे चौकशी करू लागला. मात्र, नवरी कुठेच दिसेनासी झाली. कुटुंबातील सदस्य रात्रभर वाट पाहात बसले. सकाळी अखेर तक्रार दाखल करण्यात आली. नवरी मुलीचा शोध घेतला असता ती प्रियकरासोबत पळून गेल्याचे समजले. तिचा शोध सुरू आहे.

नवरा म्हणाला, प्रियकरासोबत पळून जायचे होते तर विवाह करायचाच नव्हता. मला सांगितले असते तरी मी मदत केली असती. परंतु, हनिमुनच्या दिवशी पळून गेल्यामुळे मला त्रास झाला. शिवाय, रात्रभर आम्ही वाट पाहात बसलो होतो. तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband waiting honeymoon room and wife run away with boyfriend at varanasi