नवरा बघतोय वाट, पत्नीने घेतली प्रियकराची गाठ...

वृत्तसंस्था
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

माहेरी गेलेली पत्नी प्रियकरासोबत पळून गेली. दुसरीकडे पती वाट पाहात राहिला....

पाटणाः विवाहानंतर माहेरी जाताना पत्नी माहेरी निघाली. माहेरी जात असताना पतीला लवकर येण्याचे आश्वासन देताना आपली वाट पाहण्यास सांगितले. परंतु, माहेरी गेलेली पत्नी प्रियकरासोबत पळून गेली. दुसरीकडे पती वाट पाहात राहिल्याची घटना बिहारमध्ये घडली.

पत्नी परत न आल्यामुळे पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पत्नी व तिच्या प्रियकराला ओडिसामधून ताब्यात घेतले असून, पुढील तपाय करत आहेत.

आदित्यपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष कुमार याचे एका युवतीसोबत विवाह झाला होता. विवाहनानंतर पत्नी माहेरी निघाली. माहेरी जाताना तिने लवकर परत येण्याचे आश्वासन दिले. परंतु, सांगितलेल्या दिवसानंतर ती आलीच नाही. पती व त्याचे कुटुंबिय वाट पाहात होते. नवविवाहीत घरी परत न आल्यामुळे पतीने गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर ती प्रियकरासोबत पळून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

युवतीने चौकशीदरम्यान सांगितले की, 'माझे विवाहाच्या अगोदरपासून प्रेमसंबंध आहेत. याबाबतची माहिती घरच्यांना दिली होती. परंतु, घरच्यांनी माझे काहीही न ऐकता विवाह लावून दिला.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband waiting wife and she is run away her lover at bihar

टॅग्स