रात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; संतापलेल्या पतीनं गळा आवळून केला खून I Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

पत्नीनं दुसऱ्यांदा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळं पतीनं तिची हत्या केली.

Crime News : रात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; संतापलेल्या पतीनं गळा आवळून केला खून

अमरोहा : आता मला सेक्स करायचा नाहीये, पत्नीच्या तोंडून हे ऐकल्यानंतर नवऱ्याचा संयम सुटला आणि कडाक्याच्या वादानंतर दोरीनं तिचा गळा आवळून खून केला. आरोपी पतीनं रात्री पत्नीला झोपेतून उठवलं आणि सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली. पहिल्यांदा बायकोनं त्याची आज्ञा पाळली. काही वेळानं त्यानं पुन्हा पत्नीला उठवून सेक्स करण्यास सांगितलं.

या प्रकारावर पत्नी चिडली आणि तिनं संबंध ठेवण्यास नकार दिला. पतीला ही गोष्ट आवडली नाही आणि रात्रीच दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात त्यानं दोरीच्या सहाय्यानं तिचा गळा आवळून खून केला. नंतर मृतदेह पॉलिथिनच्या पिशवीत बांधून घरापासून 50 किमी दूर फेकून दिला. त्यानंतर पतीनं पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली.

हेही वाचा: Ambedkar College : 'ब्राह्मणांनो, हरियाणा सोडा'; JNU नंतर खलिस्तान समर्थनार्थ काॅलेजच्या भिंतींवर लिहिल्या घोषणा

अमरोहा (Amroha) येथील रहिवासी असलेल्या रुखसारचं 2013 मध्ये अन्वरसोबत लग्न झालं होतं. तिला तीन मुलं आहेत. अन्वर हा त्याच्या घराच्या तळमजल्यावर बेकरी चालवतो, तर त्याचं कुटुंब पहिल्या मजल्यावर राहतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबर रोजी उशिरा दोनदा शारीरिक संबंध ठेवण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर अन्वरनं पत्नीची हत्या केली. ठाकूरद्वारातील रतुपुरा गावाजवळ पोलिसांनी मंगळवारी एका महिलेचा अनोळखी मृतदेह ताब्यात घेतला. ठाकूरद्वारा पोलिस ठाण्यात (Thakurdwara Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला असून मृतदेहाचे फोटो जवळच्या पोलिस स्टेशन आणि जिल्ह्याच्या पोलिसांकडं पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

पतीकडून खुनाची कबुली

दरम्यान, तक्रारीनंतर मुरादाबाद पोलिसांनी अन्वरला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावलं. चौकशीदरम्यान त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ठाकूरद्वाराचे अधिकारी अर्पित कपूर यांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान अन्वरनं रुखसारची हत्या केल्याची कबुली दिलीय. तो पत्नीच्या वागण्यानं आधीच त्रस्त होता आणि तिला मारायचा त्याचा प्लान होता. सोमवारी पत्नीनं दुसऱ्यांदा शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळं त्यानं तिची हत्या केली.