esakal | भाजप सत्तेत आल्यास हैदराबादचं नाव बदलू; योगी आदित्यनाथ गरजले
sakal

बोलून बातमी शोधा

yogi_20adityanath

हैदराबादमध्ये आपल्या रोड शोदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एआयएमआयएम जोरदार टीकास्त्र सोडले.

भाजप सत्तेत आल्यास हैदराबादचं नाव बदलू; योगी आदित्यनाथ गरजले

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

हैदराबाद- हैदराबादमध्ये आपल्या रोड शोदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमआयएमवर जोरदार टीकास्त्र सोडले. एआयएमआयएम आमदाराच्या शपथग्रहनाचा उल्लेख करत ते म्हणाले की, यांनी आपल्या शपथग्रहनादरम्यान हिंदुस्तानचे नाव घेण्यासही नकार दिला. ही घटना असदुद्दीन ओवैसी आणि एआयएमआयएमचा खरा चेहरा दाखवते.  

हैदराबादचे नाव बदलणार भाजप!

रोड शोदरम्यान योगी म्हणाले की, आम्ही फैजाबादचे नाव बदलून अयोध्या केलं. अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले. हे आमच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. तर मग हैदराबादचे प्राचिन नाव बदलून भाग्यनगर का केले जाऊ शकत नाही?

मुक्त अन् निष्पक्ष निवडणुका अमेरिकी लोकशाहीच्या रक्तात; न्यायालयाने ट्रम्पना...

काश्मीरमध्ये जमीन घेऊ शकतात हैदराबादचे लोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात काश्मिरचे अनुच्छेद 370 हटवून राज्याचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आला. आम्ही हैदराबादच्या लोकांना स्वतंत्रता दिली आहे की, ते आता सहजपणे जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करु शकतात, असं योगी आदित्यनाथ म्हणाले. 

बिहारमधील विजयानंतर आता भाजपचे लक्ष तेलंगना आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांकडे आहे. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोर्चा संभाळला आहे. योगींनी हैदराबाद निवडणुतीत थेटपणे एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना आव्हान दिले आहे. तेलंगनात ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपिल कॉरपोरेशनच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी योगी यांनी मलकजगिरी भागात सभा आणि त्यानंतर रोड सो घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

पहिल्यांदाच भाजप मैदानात

हैदराबाद म्युनिसिपिल कॉरपोरेशनच्या निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच मैदानात आहे. याठिकाणी 24 विधानसभेच्या जागा असून याचे वार्षिक बजेट 5 हजार कोटी आहे. तेलंगणाच्या जीडीपीचा मोठा हिस्सा याच भागातून येतो. 

loading image