
Video : देशभरात उष्णतेची लाट, पण 'या' शहरात पाऊस अन् पूर
हैदराबाद : देशभरात सध्या कडक उन्हाळा सुरु असून बहुतांश भागातील तापमान ४५ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. पण तेलंगणातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला असून इथल्या हैदराबाद शहरात तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं प्रवासासाठी नागरिक रबरी बोटींचा वापर करत आहेत. (Hyderabad city got waterlogged due to heavy rain People using rubber boat)
पीटीआयच्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. यामध्ये अंबरपेट, कुकटपल्ली, मलकजगिरी आणि मुर्शिताबाद आणि ओल्ड हैदराबाद शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं साचलेलं पाणी उपसण्याचं तसेच ठिकठिकाणी रस्त्यात पडलेल्या झाडं दूर करण्याचं काम सुरु केलं आहे.
खासदार ओवैसींनी केलं पावसाच्या अपडेटचं ट्वीट
दरम्यान, हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील त्यांच्या रहिवासी भागातील पावसाचे अपडेट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ठिकठिकाणी पाणी साचल्यानं आपत्कालिन टीम तैनात करण्याबाबत मी हैदरबाद पालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.
Web Title: Hyderabad City Got Waterlogged Due To Heavy Rain People Using Rubber Boat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..