esakal | Hyderabad Election: ओवैसींनी उभे केलेल्या 5 हिंदू उमेदवारांचा रिझल्ट काय?
sakal

बोलून बातमी शोधा

asasuddin owaisi

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचा पक्ष ग्रेटर हैदराबादच्या नगर निगमच्या (GHMC) निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत आला आहे.

Hyderabad Election: ओवैसींनी उभे केलेल्या 5 हिंदू उमेदवारांचा रिझल्ट काय?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

हैदराबाद- एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचा पक्ष ग्रेटर हैदराबादच्या नगर निगमच्या (GHMC) निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत आला आहे. त्यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने 44 जागा जिंकल्या आहेत. ओवैसी यांनी आपल्या पक्षातर्फे 5 हिंदू उमेदवारांनाही मैदानात उतरवले होते. 

हैदराबादचे खासदार ओवैसी यांनी 51 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यातील 10 टक्के जागांवर त्यांनी हिंदू उमेदवारांना म्हणजे 5 जणांना तिकिट दिले होते. पाचपैकी 3 उमेदवारांनी निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे, तर दोन जागांवर उमेदवारांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे, मागील निवडणुकीत केवळ 4 जागा जिंकणारी भाजप यावेळी 48 जागा जिंकली आहे. 

3 जागांवर विजय

ओवैसी यांचा पक्ष AIMIM च्या तिकिटावर पुरानापुल वॉर्डातून सुन्नम राज मोहन, फलकनुमा वॉर्डातून से.के. थारा भाई आणि कारवन वॉर्डातून मांदागिरी स्वामी यादव यांनी विजय प्राप्त केला आहे. तर जामबाग वॉर्डातून जदाला रविंद्र यांचा भाजपचे राकेश जयस्वाल यांनी पराभव केला. कुतुबुल्लापुर वॉर्डातून से. ई. राजेश गौड यांचा टीआरएसच्या गौरिश पारिजाता यांनी पराभव केला. 

लस घेऊनही अनिल विज यांना कोरोना झाला कसा? भारत बायोटेकने दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या (जीएचएमसी) निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) सर्वाधिक 56 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. परंतु, त्यांना बहुमत मिळू शकलेले नाही. भाजपने जबरदस्त मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींचा पक्ष एमआयएमने 44 जागा मिळवल्या तर काँग्रेसला मात्र दोनच जागा मिळाल्या आहेत. 

आकडेवारीवर नजर टाकल्यास ओवेसींच्या पक्षाचा स्ट्राइक रेट सर्वात चांगला आहे. ओवेसींनी 150 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत केवळ 51 जागांवर उमेदवार उतरवले होते. यातील 44 जागांवर विजय नोंदवण्यात त्यांना यश आले. म्हणजे ओवेसींचा स्ट्राइक रेट 86 टक्क्यांपेक्षा जास्त राहिला. तर टीआरएसला गतवेळीपेक्षा 33 जागा कमी मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसला 2016 मधील निवडणुकीच्या तुलनेत 40 टक्के जागा कमी मिळाल्या आहेत. 

loading image