Video: हैदराबाद पोलिसांवर फुलांचा वर्षाव...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

हैदराबाद बलात्कार प्रकरणात आरोपींचा एन्काऊंटर करणाऱ्या हैदराबाद पोलिसांवर स्थानिक नागरिकांनी आज (शुक्रवार) फुलांचा वर्षाव केला आहे. हैदराबाद पोलिस जिंदाबाद, अशा घोषणाही स्थानिक देत आहेत.

हैदराबाद: हैदराबाद बलात्कार प्रकरणात आरोपींचा एन्काऊंटर करणाऱ्या हैदराबाद पोलिसांवर स्थानिक नागरिकांनी आज (शुक्रवार) फुलांचा वर्षाव केला आहे. हैदराबाद पोलिस जिंदाबाद, अशा घोषणाही स्थानिक देत आहेत.

पोलिसांच्या कारवाईनंतर घटनास्थळी अद्यापही मोठा पोलिस फौजफाटा तैनात असून, स्थानिक नागरिकांनीही या भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. यावेळी या नागरिकांनी पोलिस कर्मचाऱ्यांना उचलून घेत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत आनंद व्यक्त केला. तर काहींनी पोलिसांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करीत त्यांच्या कृतीला पाठींबा दर्शवला. महिलांनी पोलिसांना राख्या बांधून, पेढे भरवले आहेत. पोलिसांच्या कौतुकाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे समर्थन केले आहे.

दरम्यान, हैदराबाद बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्याबरोबरच घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी चारही आरोपींना नेण्यात आले होते. पोलिसांच्या तावडीतून पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा एन्काऊंटर केला. पहाटे तीन वाजता ही घटना घडली. या घटनेचे देशभरात दोन्ही बाजूंनी पडसाद उमटत आहेत. सोशल मीडियावरही पोलिसांचे अभिनंदन करण्याबरोबरच कायदा हातात घेतल्याच्याही प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hyderabad encounter locals shower rose petals on cops