

Duplicate Currency and Fake Police Double Trap
कोणत्याही क्राईम थ्रिलर सिनेमाची पटकथा फिकी पडावी असा एक अत्यंत थक्क करणारा आणि अजब आंतरराज्यीय गुन्हेगारी प्रकार तेलंगणातील हैदराबादमध्ये उघडकीस आला आहे. कोणत्याही मोठ्या पदवीचे किंवा शिक्षणाचे ज्ञान नसताना, केवळ यूट्यूबवरील (YouTube) ट्युटोरियल्स आणि व्हिडिओ पाहून एका टोळीने चक्क ५०० रुपयांच्या ६ कोटी ७८ लाख रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा छापून काढल्या. इतकेच नाही, तर या नोटा बाजारात चालवण्यासाठी या टोळीने 'तोतया पोलीस' बनून खऱ्या नोटा घेऊन येणाऱ्या सावजांनाच लुटण्याचा दुहेरी खेळ सुरू केला होता.