Human Trafficking : मुलीसाठी तीन लाख, मुलासाठी पाच लाख रुपये! हैदराबादमध्ये नवजात शिशूंच्या विक्रीचा दर, तस्करी करणारी टोळी अटकेत
Hyderabad Crime : हैदराबाद पोलिसांनी नवजात शिशूंची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मुलींसाठी तीन लाख आणि मुलांसाठी पाच लाख रुपयांना विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले.
हैदराबाद : नवजात बाळांचे अपहरण करून परराज्यात त्यांची विक्री करणाऱ्या मानवी तस्करीच्या आंतरराज्य टोळीचे कारनामे हैदराबादमधील राचकोंडा पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.