- एम.एन.एस.कुमार
हैदराबाद - तेलंगणची राजधानी हैदराबाद ७२ व्या जगत सुंदरी स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. शहरात ही स्पर्धा बुधवारपासून (ता. ७) सुरू होणार आहे. यातील स्पर्धक शहरात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.
तेलंगणच्या परंपरेप्रमाणे त्यांचे स्वागत करण्यात आले. उद्घाटन सोहळा शनिवारी (ता. १०) होणार आहे. यानिमित्त शहर सुशोभित केले असून रस्ते, चौक, पर्यटन स्थळे आणि महत्त्वाच्या इमारती सजविण्यात आल्या आहेत.