Hyderabad News : ‘माई का लाल’ जन्माला यायचायं; अकबरुद्दीन ओवेसी यांची पोलिस अधिकाऱ्याला भरसभेत धमकी

‘मला रोखणारा माई का लाल जन्माला आलेला नाही. मी लोकांना सांगितले तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. त्यांना तुमच्या मागे पळवू का?
MIM Candidate Ahmed Balala Bin Abdulla Balala
MIM Candidate Ahmed Balala Bin Abdulla Balalasakal

हैदराबाद - ‘मला रोखणारा माई का लाल जन्माला आलेला नाही. मी लोकांना सांगितले तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. त्यांना तुमच्या मागे पळवू का? हे लोक आपल्याला कमकुवत करू इच्छित आहेत आणि म्हणूनच मी बोलत आहे,’ असे खळबळजनक वक्तव्य ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीनचे (एमआयएम)नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी काल एका सभेच्या वेळी केले.

तेलंगण विधानसभेतील प्रचार आता शेवटच्या टप्प्यांत आला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेशचे मतदान आटोपल्याने राष्ट्रीय पक्षाचे स्टारप्रचारक तेलंगणच्या मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे एमआयएमचे नेते उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सभा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पोलिस अधिकाऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

काल सभेच्या वेळी नियुक्तीवर असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने भाषणाची वेळ संपत आल्याची सूचना करताच ओवेसी यांनी संबंधित अधिकाऱ्याला धमकाविणारे विधान केले. हा प्रकार २१ नोव्हेंबर रोजी घडला.

सभेत काय घडले?

पोलिस अधिकाऱ्याने ओवेसी यांना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची सूचना केली. आचारसंहितेने ठरवून दिलेली वेळ संपत आली आहे, असे ते म्हणाले. पण ओवेसी यांनी त्या पोलिस अधिकाऱ्याला सभेतून निघून जाण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘माझ्या समर्थकांना सांगितले तर तुम्हाला येथून पळून जाण्याची वेळ येईल. अजून पाच मिनिटे बाकी आहेत आणि मी तेवढा वेळ बोलत राहीन.’

दरम्यान, यासंदर्भात पत्रकार परिषदेत खासदार ओवेसी म्हणाले, ‘जर वेळ रात्री १०.०१ ची असेल तर भाषण थांबविण्याचा पोलिसांना अधिकार आहे. परंतु पाच मिनिटे असतील तर ते व्यासपीठावर का आले? एका वक्त्यासाठी सुरुवात, समारोपाचे भाषण हे खूप महत्त्वाचे असते.’

ओवेसींच्या वक्तव्यावर भाजपची टीका

आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्यावर भाजपने टीका केली आहे. असा प्रकार भाजपच्या राजवटीत घडला तर बुलडोझर कारवाई होईल. अनेक काळापासून काँग्रेस आणि बीआरएसच्या पाठिंब्याने एमआयएम पक्ष हे एक ‘क्रिमिनल एंटरप्रायझेस’ बनलेले आहे. त्यामुळे हैदराबाद शहराला गुन्हेगारीने ग्रासले असून हे शहर विकासापासून वंचित राहिले आहे.

शहरात जाणीवपूर्वक निर्माण केलेली घाण दूर करण्याची आता वेळ आली आहे. भाजपच्या राजवटीत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही आणि बुलडोझरने कारवाई केली जाईल, असे तेलंगण भाजपने म्हटले आहे.

आम्ही गेलो नाही तर ते (राहुल गांधी) अमेठी हरले, गेलो असतो तर काय झाले असते? राहुल गांधी वायनाडमधून जिंकले, कारण त्यांना मुस्लिमांची ३५ टक्के मते मिळाली. काँग्रेसकडे आज कोणी मतदार राहिला असेल तर तो मुस्लिम समुदाय. त्यामुळे जेव्हा एमआयएम अल्पसंख्याकांच्या हक्काचा मुद्दा मांडते, तेव्हा काँग्रेस पक्ष आमच्या भूमिकेमुळे अस्वस्थ होतो.

- असदुद्दीन ओवेसी, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com