cm yogi adityanath
sakal
गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरात सध्या मकर संक्रांतीचा उत्साह आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाविकांच्या भेटीगाठी घेत असताना एका छोट्या मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मुख्यमंत्री एका खुर्चीवर बसलेले असताना हा चिमुकला धाडसाने त्यांच्या जवळ पोहोचला. योगीजींनीही हसून त्याचे स्वागत केले आणि प्रेमळ स्वरात विचारले, 'आणखी काय हवे तुला, सांग?' त्यावर या छोट्या पाहुण्याने मुख्यमंत्र्यांच्या कानात हळूच सांगितले, 'मला चिप्स पाहिजेत!'