"विधानभवनात येण्यापासून मलाच रोखले''; बंगालच्या राज्यपालांचा आरोप 

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

पश्‍चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनकर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता राज्यपाल जगदीप धनकर यांनी आपल्याला बंगालमधील विधानभवनात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप राज्य सरकारवर केला आहे. 

कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनकर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता राज्यपाल जगदीप धनकर यांनी आपल्याला बंगालमधील विधानभवनात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप राज्य सरकारवर केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पश्‍चिम बंगालमधील विधानभवनाच्या परिसरातील प्रवेशद्वार क्रमांक 3 हे राज्यपालांसाठी राखीव आहे. या प्रवेशद्वारातून केवळ राज्यपाल विधानभवनाच्या आवारात येऊ शकतात. पण आधी सूचना दिलेली असतानाही हे प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर धनकर यांनी माध्यम प्रतिनिधींसाठी राखीव असलेल्या प्रवेशद्वार क्रमांक 4 मधून विधानभवनात प्रवेश केला. यानंतर माध्यमांशी बोलताना धनकर यांनी राज्य सरकारने आपल्याला विधानभवनात प्रवेश करण्यापासून रोखल्याचा आरोप केला. तसेच या घटनेमुळे देशातील लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासली गेली आहे, असेही जगदीप धनकर यांनी म्हटले आहे. 

'वेळीच कारवाई केली असती तर...' उन्नाव बलात्कार प्रकरणावर पवार भडकले

दरम्यान, बुधवारी राज्यपालांनी विधानसभेचे अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांना कळविले होते की आपण विधानभवनात येणार आहोत. तेथील सुविधा मला बघायच्या आहेत आणि ग्रंथालयातही जायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I was not allowed to enter the assembly says West Bengal governor Jagdeep Dhankar