विंग कमांडरने मला रुममध्ये बोलावलं अन्...; IAF महिला अधिकाऱ्याने केला गंभीर आरोप, तक्रार दाखल

Women IAF officer has filed a police complaint: महिला अधिकाऱ्याने असाही दावा केलाय की, यासंदर्भातील चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली होती. पण, याप्रकरणी समितीने तिचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
IAF officer RAPE
IAF officer RAPE
Updated on: 

नवी दिल्ली- एका एअर फोर्सच्या ( IAF) अधिकारी महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने बलात्कार, विनयभंग आणि सातत्याने मानसिक छळ केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर एअर फोर्स स्टेशनमधील हा प्रकार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

महिला अधिकाऱ्याने असाही दावा केलाय की, यासंदर्भातील चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली होती. पण, याप्रकरणी समितीने तिचे सर्व आरोप फेटाळले आहेत. फ्लाईंग ऑफिसर महिलेने आरोप केलाय की, विंग कमांडरने नवीन वर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबर रोजी तिला तिच्या रुममध्ये बोलावले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com