

IAS, IPS and IFS officers to guide Class 12 students on careers, competitive exams and future opportunities in Uttar Pradesh
Sakal
लखनौ : उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधींची योग्य माहिती मिळावी, यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने नवा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात तैनात असलेले तरुण IAS, IPS आणि IFS अधिकारी दरमहा किमान एका इंटरमिजिएट म्हणजेच १२ वीच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासाचे मार्गदर्शन करणे नसून, त्यांना भविष्यातील करिअरच्या विविध संधींची माहिती देणे आणि योग्य नियोजनासाठी तयार करणे हा आहे.