आयआयआटीच्या विद्यार्थीनीचा लैंगिक छळ; IAS अधिकाऱ्याला अटक

आयआयआटीच्या विद्यार्थीनीचा लैंगिक छळ; IAS अधिकाऱ्याला अटक

खूंटा - झारखंडमध्ये खुंटीचे एसडीएम सय्यद रियाझ अहमद यांना मंगळवारी लैंगिक छळ प्रकरणी पोलिसांनी अटक केली. डिनर पार्टीमध्ये एकटी असल्याचा संधी साधून आयआयटीच्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा आरोप एसडीएमवर करण्यात आला आहे. अटकेनंतर एसडीएमा अहमद यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अहमद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. (IAS officer arrested for sexual harassment)

पीडित मुलगी आयआयटीची विद्यार्थिनी असून ती मुळची हिमाचल प्रदेशची आहे. पीडित विद्यार्थीनी खुंटी येथे इंटर्नशीप करण्यासाठी आली होती. ही घटना २ जुलै रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी रात्रीच एसडीएम अहमद यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) पोलिसांनी आरोपी एसडीएमला अटक केली.

एसडीएम अहमद यांनी 1 जुलैच्या रात्री इंटर्नशीपसाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना डिनर पार्टी दिली होती. यावेळी सर्वांना दारूही देण्यात आली. पार्टी संपल्यानंतर एक-दोन विद्यार्थी तिथे होते. यादरम्यान एसडीएमने दारू पिऊन पीडितेचा लैंगिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चिडलेल्या विद्यार्थीनीने एसडीएमविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी एसपी अमन कुमार म्हणाले की, एफआयआर दाखल होताच पोलिसांनी एसडीएमला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. उर्वरित लोकांचीही चौकशी सुरू आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. सध्या कलम 354A आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर आरोपींविरुद्ध कलम 354 ही जोडण्यात आल्याचं अमन कुमार यांनी सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, इतर राज्यांतून पीडितेसह आठ आयआयटीचे विद्यार्थी खुंटीत इंटर्नशिपसाठी आले होते. शनिवारी रात्री एसडीएमच्या निवासस्थानी आयोजित डिनर पार्टीला ते उपस्थित होते. पीडितेने तक्रारीत म्हटलं की, एकटी असल्याने एसडीएमने आपल्यावर लैंगिक अत्याचार केले. प्राथमिक तपासात विद्यार्थ्याचा आरोप खरा असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com