कलेक्टरनं ऑफिसमध्येच केला बलात्कार; महिलेचा गंभीर आरोप

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जून 2020

पतीला नोकरीवरून निलंबित करण्याची भीती आणि कामाचं आमिष दाखवून माजी जिल्हाधिकाऱ्यानं बलात्कार केला असल्याचा धक्कादायक आरोप एका महिलेने केला आहे. ही घटना छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यात घडली आहे.

रायपूर : पतीला नोकरीवरून निलंबित करण्याची भीती आणि कामाचं आमिष दाखवून माजी जिल्हाधिकाऱ्यानं बलात्कार केला असल्याचा धक्कादायक आरोप एका महिलेने केला आहे. ही घटना छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यात घडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या महिलेनं माजी जिल्ह्याधिकाऱ्यावर अश्लील भाषेत मेसेज, व्हिडीओ पाठवून बोलल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. तसेच ऑफिसातच तिचे लैंगिक शोषण केले असल्याचाही आरोप केला आहे. माजी जिल्हाधिकारी जनक प्रसाद पाठक यांच्या विरोधात महिलेनं ही तक्रार दाखल केली आहे. एका सामाजिक संस्थेचे कामानिमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांना ही महिला कार्यालयात भेटायला गेली होती. त्यावेळी तिच्याकडून मोबाईलनंबर घेऊन काम झाल्यानंतर फोन करेन असं सांगितलं. कामाऐवजी या जिल्हाधिकाऱ्यांनी तिच्यासोबत अश्लील मेसेज पाठवणं, व्हिडीओ पाठवण्यास सुरुवात केली असल्याचेही तिने म्हटले आहे.

या पीडित महिलेचे पती सरकारी कार्यालयात काम करतात. त्यांना प्रमोशन देण्याचं प्रलोभन आणि या महिलेचं काम करण्याची अट पूर्ण करण्यासाठी पीडित महिलेनं त्यांना भेटावं यासाठी सातत्यानं तिला सांगण्यात आलं. पीडितेनं नकार दिल्यास पतीला नोकरीवरून निलंबित करेन अशी धमकी या पीडितेला देण्यात आली. कामानिमित्तानं पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेली असताना कार्यालयातच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. ही घटना १५ मे रोजी घडली असून या प्रकरणी पीडितेनं पोलिसांनी फोनमधील सर्व मेसेज आणि व्हिडीओही दाखवल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी माजी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IAS officer booked after woman accuses him of rape in Chhattisgarh

टॅग्स
टॉपिकस