ICSE Board Results 2023 : 10वी, 12वीचा आज निकाल! दोनच मिनिटांत 'येथे' पाहा रिझल्ट

ICSE Board Results 2023
ICSE Board Results 2023google

नवी दिल्ली : भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) आज (13 मे) ICSE इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर करणार आहे. हा निकाल आज दुपारी 3 वाजता अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जाईल.

दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांचे ISCE result 2023 तपासण्यासाठी त्यांचा इंडेक्स क्रमांक आणि दिलेल्या कॅप्चा कोडसह UID भरणे आवश्यक आहे. विद्यार्थी त्यांचे मार्कशीट्स results.cisce.org (https://results.cisce.org/) या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतील

ICSE Board Results 2023
USA Vs Iran : इराणच्या दादागिरीमुळे अमेरिकेचा संताप! अरब प्रदेशात वाढवणार लष्करी सामर्थ्य

ICSE 10वीचा निकाल 2023 कसा तपासायचा:

  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या

  • उजव्या वरच्या कोपर्‍यात ‘Results 2023’ वर क्लिक करा

  • आता, ICSE Class 10 results 2023 विंडो उघडेल

  • इंडेक्स क्रमांक, UID आणि कॅप्चा कोड इंटर करा आणि ‘show result’ वर क्लिक करा.

  • त्यानंतर, निकाल स्क्रीनवर दिसेल

  • तुम्ही या निकालाची प्रिंट काढू शकता

ICSE Board Results 2023
इतकं कमवलं तरी कसं? कोटींचा बंगला, १० गाड्या, ३० लाखांचा TV...; इंजिनिअरचा पगार मात्र ३० हजार

एसएमएसद्वारे निकाल (ICSE Results 2023) कसा पाहाल?

उमेदवार त्यांचा ICSE 10वी निकाल तपासण्यासाठी खाली दिलेल्या फॉरमॅटनुसार एसएमएसद्वारे त्यांचा ICSE निकाल 2023 पाहू शकतात.

SMS फॉरमॅट : ICSE निकालासाठी या क्रमांकावर एसएमएस पाठवा: 09248082883.

SMS उदाहरण: ICSE 1786257

या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचा ICSE 2023 चा इयत्ता 10वीचा निकाल त्यांच्या मोबाईलवर पाहता येईल.

ICSE Board Results 2023
SC News : राहुल गांधींना शिक्षा सुनावलेल्या 'त्या' न्यायधीशाचे प्रमोशन स्थगित; सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

ICSE इयत्ता 10 वीच्या परीक्षा 27 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू झाल्या होत्या. तर परीक्षा 29 मार्च 2023 रोजी जीवशास्त्राच्या पेपरसह संपली. त्यानंतर विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत.

ऑनलाइन उपलब्ध असलेले ICSE Result 2023 हे तात्पुरते स्वरूपाचे आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांना ICSE मार्कशीटवर नमूद केलेले सर्व तपशील ऑनलाइन तपासण्याचा सल्ला दिला जातो. काही विसंगती किंवा त्रुटी आढळल्यास, त्ंयानी त्रुटी सुधारण्यासाठी बोर्ड अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com