मोठी बातमी! ICSE आणि ISC परिक्षांचा निकाल उद्या 3 वाजता

Result
Resultsakal media
Summary

ICSE आणि ISC चा निकाल उद्या (24 जुलै) दुपारी तीन वाजता लागणार आहे. CISCE (Council for the Indian School Certificate Examinations ) याबाबत पुष्टी केली आहे.

नवी दिल्ली- ICSE आणि ISC चा निकाल उद्या (24 जुलै) दुपारी तीन वाजता लागणार आहे. CISCE (Council for the Indian School Certificate Examinations ) याबाबत पुष्टी केली आहे. 10 वी आणि 12 वी परिक्षांच्या निकाल उद्या दुपारी तीन वाजता लावला जाईल, असं CISCE म्हटलं आहे. निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल, अंस सांगण्यात आलं आहे. (ICSE ISC examinations results tomorrow at 3 pm CISCE confirms knp94)

ICSE आणि ISC चा निकाल वेबसाईट cisce.org आणि एसएमसच्या माध्यमातून पाहता येणार आहे. संबंधित शाळा प्रीन्सिपल लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून करिअर पोर्टलवर विद्यार्थ्यांचे निकाल पाहू शकतील. विद्यार्थ्यांना एसएमएसच्या माध्यमातून रिझल्ट पाहायचा असेल तर यूनिक आयडी नंबर 09248082883 वर पाठवावा 'ICSE/ISC (Unique ID) लागेल.

Result
रायगड: तळई गावात दरड कोसळून 32 जणांना मृत्यू

ICSE आणि ISC परिषदेने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. जुनमध्ये परिषदेने जाहीर केलं होतं की, अंतर्गत मूल्यांकनाद्वारे विद्यार्थाचे निकाल जाहीर केले जातील. विद्यार्थ्यांना या मूल्यांकनाबाबत काही आक्षेप असल्यास त्यांना यासंदर्भातील अर्ज शाळेमध्ये पाठवता येईल. शाळा अशाप्रकारच्या अर्जांची पडताळणी करेल, शाळेला ते योग्य वाटल्यास अशाप्रकारची तक्रार पुढे CISCE कडे पाठवता येईल. 10 वीच्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारची विनंती asicse@cisce.org वर पाठवता येईल, तर 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी asisc@cisce.org विनंती करता येईल. CISCE च्या अधिकृत नोटिसमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com