esakal | फक्त १ रुपयात इडली...८० वर्षीय आजींचा उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

फक्त १ रुपयात इडली... ८० वर्षीय आजींचा उपक्रम

८० वर्षीय कमलाथल आजी दररोज सकाळी लवकर उठून चवदार, स्वादिष्ट इडली बनवतात. त्याला चटपटीत अशा सांबर, चटणीची जोड असते. आणि विशेष म्हणजे त्या ही इडली... ग्राहकांना केवळ १ रुपयात विकतात.

फक्त १ रुपयात इडली...८० वर्षीय आजींचा उपक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अनेक वृद्ध लोक वयाची ८० पार केल्यानंतर सर्व कामांमधून निवृत्ती घेतात. मात्र, तामिळनाडूमधील कमलाथल आजी या वयातही आपल्या घरात एक दुकान चालवतात. त्या काय करतात, हे ऐकून तुम्हांलाही नवल वाटेल! कमलाथल आजी दररोज सकाळी लवकर उठून चवदार, स्वादिष्ट इडली बनवतात. त्याला चटपटीत अशा सांबर, चटणीची जोड असते. आणि विशेष म्हणजे त्या ही इडली... ग्राहकांना केवळ १ रुपयात विकतात.

संयुक्त कुटुंबात वाढल्याने कमलाथल आजींना मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करण्याची सवय आहे. तामिळनाडूमधील वडिवेलमपालम येथे गेल्या ३० वर्षांपासून त्या आपले हे इडली विक्रीचे दुकान चालवतात. इडली बनण्यासाठीची सर्व कामे त्या एकट्याच करतात. इडलीचे पीठ दळण्यासाठी त्यांना ४ तास लागतात. हे काम त्या आदल्या दिवशी संध्याकाळीच करतात. दळलेले पीठ रात्रभर किण्वन प्रक्रियेसाठी ठेऊन, सकाळी त्यापासून त्या ताजी इडली बनवून ग्राहकांना विकतात. हा त्यांचा रोजचा दिनक्रम असतो.

प्रतिदिन १ हजार इडलींची विक्री 

मिळालेल्या माहितीनुसार, त्या दररोज १ हजार इडलींची विक्री करतात. १० वर्षांपूर्वी त्या ही इडली केवळ ५० पैसे दराने विक्री करत होत्या. मात्र, ५० पैसे हे नाणेच चलनातून बाद झाल्याने, त्या आता केवळ १ रुपयात ग्राहकांना इडली खाऊ घालतात.

कौतुकास्पद कार्य

कमलाथल आजी गेल्या ३० वर्षांपासून गरीब, गरजू, भुकेल्या लोकांचे पोट भरण्यासाठी हे चांगले काम करत आहेत. त्यामुळे वयाची ८० वर्षीही त्या ज्या उत्साहाने काम करतात. हे पाहून त्यांचं जितकं कौतुक करावं ते कमीच आहे.

loading image
go to top