#Lockdown2.0 : ३३ दिवसांचा लॉकडाउन ३ मेनंतर पुढेही सरसकट वाढवला तर...

Lockdown
Lockdown

नवी दिल्ली - ३ मेपासून कोरोनामुक्त असलेल्या भागांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सर्व व्यवहार पूर्ववत करण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. मुंबई,  पुणे, इंदूर, जयपूर, दिल्ली, नोएडा, कोलकता यासारख्या रेड झोनमधील शहरांसाठी वेगळे नियोजन करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने लॉकडाउननंतरच्या सवलतींबाबतचा आराखडा तयार करण्यास सुरवात केली आहे. तब्बल ३३ दिवसांचा लॉकडाउन ३ मेनंतर पुढेही सरसकट वाढवला तर जेथे कोरोनाचा उद्रेक नाही तेथेही लोकभावनेचा उद्रेक होऊ शकतो. कोरोनाचा सामूहिक प्रसार रोखणे, अर्थकारणाचे चाक फिरते राहील याची काळजी घेणे आणि लोकांचा संताप वाढू न देणे यांचा समतोल साधण्याची तारेवरची कसरत सरकारला करावी लागणार आहे.  जेथे कोरोनाचा प्रसार नाही व २८ दिवसांमध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही, त्या ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना सूट दिली जाईल. मात्र गर्दी जमू नये यासाठीच्या अटी तेवढ्याच पाळण्यात येतील. ग्रीन झोनमधील लॉकडाउन उठविण्याबाबत मंत्रिगटामध्ये तत्त्वतः सहमती झाल्याचे समजते. त्याच वेळी लॉकडाउन उठविल्यानंतर मास्क लावणे व सोशल डिस्टन्सिंगच्या अटींचे पालन होत नसल्यास पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा पर्यायही खुला ठेवण्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात येणार आहे. आंतरराज्य बससेवा, रेल्वे आणि विमान वाहतूक लगेच पूर्ववत होण्याची शक्यता कमीच आहे.

लग्नसमारंभ, राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक मेळावे, गर्दी जमते अशा बाजारपेठा यांच्यावरील बंदी जून महिन्यापर्यंत जारी राहण्याची शक्यता आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २७ एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून त्यानंतर पुढील रणनीती आखण्यात येईल. त्याचबरोबरच  राजकीय पक्षांचे नेते वैद्यकीय तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबर चर्चेची आणखी एक फेरी पंतप्रधान घेऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com