Shashi Tharoor: शशी थरुर अध्यक्ष बनले तर काय होतील काँग्रेसमध्ये बदल?

शशी थरुर यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
Congress President candidate Shashi Tharoor Chennai visit
Congress President candidate Shashi Tharoor Chennai visit

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता केवळ पाच दिवसच उरले आहेत. यापार्श्वभूमीवर शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खर्गे या दोन्ही उमेदवारांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा वेग वाढवला आहे. दोन्ही नेते आपापली धोरणं सार्वजनिक करत आहेत. त्यातच थरुर जर अध्यक्ष बनले तर ते काँग्रेसमध्ये काय बदल घडवून आणतील हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. (if Shashi Tharoor become president then what changes will happened in Congress)

Congress President candidate Shashi Tharoor Chennai visit
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाची होणार चौकशी

थरुर यांनी म्हटलं, "प्रदेश काँग्रेस कमिटीचे (पीसीसी) अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, मंडल अध्यक्ष तसेच बूथ अध्यक्षांना प्रत्यक्षात अधिकार देत राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला सशक्त बनवण गरजेचं आहे. याशिवाय 'एक व्यक्ती, एक पद' आणि 'एक कुटुंब, एक तिकीट' हा नियम लागू करण्यात येईल. आपल्याला सत्तेचं विकेंद्रीकरण करावं लागेल आणि पक्षाच्या तळागळातील कार्यकर्त्यांना खरोखर सशक्त बनवावं लागेल. उदाहरणासाठी आपल्या प्रदेश अध्यक्षांना गेल्या २२ वर्षात कोणतीही भूमिका नव्हती, असा आरोपही त्यांनी केला.

स्थानिक नेत्यांच्या मताचा देखील समावेश व्हावा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांच्या व्यासपीठावर एक जागा निश्चित करुन त्यांच्या निवडीचा सन्मान केला पाहिजे. जेव्हा कोणी स्थानिक वरिष्ठ नेता दौरा करतो तेव्हा त्यांचं मत जाणून घेतलं पाहिजे, जे उमेदवारांच्या निवडीपुर्वीच व्हायला हवं, असंही थरुर यांनी स्पष्ट केलंय.

'मी' नव्हे 'आपण' या भूमिकेचा पुरस्कर्ता

थरुर यांनी म्हटलं, सन २०१४ मध्ये युपीएच्या घोषणेतील "मी नाही आपण" याचा मी मोठा पुरस्कर्ता आहे. काँग्रेस पक्षाला नवं रुप देण्यासाठी तळागळातील नेत्यांना सशक्त बनवणे आणि आपल्या यशात कार्यकर्त्यांना समाविष्ट करण्यामुळं नव्या अध्यक्षांवरील ओझं कमी होतं. यामुळं प्रादेशिक पातळीवर मजबूत नेतृत्व तयार करण्यास मदत मिळेल.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला मतदान

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. तसेच १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर या निवडणुकीचे उमेदवार आहेत. यामध्ये खर्गे यांची विजयाचे दावेदार मानले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com