PM मोदी म्हणतात, नेहरुंचं नाव घेतलं तरी अडचण, नाही घेतलं तरी अडचण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM मोदी म्हणतात, नेहरुंचं नाव घेतलं तरी अडचण, नाही घेतलं तरी अडचण

PM मोदी म्हणतात, नेहरुंचं नाव घेतलं तरी अडचण, नाही घेतलं तरी अडचण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANI या वृत्तसंस्थेला आज मुलाखत दिली आहे. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी दिलेल्या या मुलाखतीमध्ये अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदींनी या पाचही राज्यांच्या निवडणुकीमध्ये आपणच विजयी होणार असल्याचं ठासून सांगितलं आहे. तर दुसरीकडे नेहरुंबाबतच्या विषयावरही भाष्य केलं आहे. (Narendra Modi)

यावेळी संसदेत दोन्ही सभागृहात बोलताना मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर, जवाहरलाल नेहरुवर टीका केली. त्यावेळी राहुल गांधींनी असं प्रत्युत्तर दिलं होतं की, माझ्या आजोबांबाबत मला कुणाच्याही सर्टीफिकेटची गरज नाहीये. यावर बोलताना मोदी म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे मी कुणाच्याही वडिलावंर अथवा आजोबांवर भाष्य केलेलं नाहीये. मी देशाच्या पंतप्रधानाने काय केलंय त्यावर बोललो आहे आणि सरकारे देशाची असतात.

पुढे ते म्हणाले की, एक पंतप्रधानमंत्र्याचे असे विचार होते तेंव्हा काय स्थिती होती आणि आता असे आहेत, तर आता काय स्थिती होती, हे जाणून घेणं देशाला हवं आहे. दुसरं असं की वारंवार असं विचारलं जातं की तुम्ही नेहरुंचं नाव का घेत नाही? आता घेतो आहे तर त्यांची अडचण होत आहे. मला समजत नाहीये की एवढी भीती कशाची आहे? असा सवालही त्यांनी केला.

पुढे भाजप लोकांच्या प्रादेशिक आकांक्षांचा आदर करत नाही या विरोधकांच्या टीकेवर पंतप्रधान म्हणाले की, आम्हाला असं वाटतं की, देशाच्या प्रगतीसाठी लोकांच्या प्रादेशिक आकांक्षांना समजून घ्यावं. मी देखील मुख्यमंत्री होतो आणि माझ्या राज्याच्या आकांक्षा समजून घेतलं. यापूर्वी, भारतात येणारे नेते फक्त दिल्लीला भेट देत असत, परंतु मी त्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेलं

पुढे बोलताना त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलंय की, आपण याआधीही दोन मुलांचा खेळ पाहिला आहे. ते इतके उद्धट आहेत की, त्यांनी याआधी 'गुजरात के दो गधे' असा उल्लेख केला होता. त्यानंतर यूपीने त्यांना धडा शिकवला आहे. आणखी एकेवेळी त्यांच्यासोबत 'दोन मुले आणि एक बुवाजी' त्यांच्यासोबत होत्या. मात्र, तरीही काही गणित जमलं नाही, अशी टीका मोदींनी यूपीतील भाजपच्या विरोधकांवर केली आहे.

भाजप नेहमीच जनतेच्या सेवेत सहभागी असतो. सत्तेत असताना आम्ही 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र घेऊन काम करतो. मला सर्व राज्यांमध्ये भाजपची लाट दिसत आहे. आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ आणि 5 राज्यांतील लोक आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी देतील, असंही त्यांनी म्हटलंय.

Web Title: If We Mention Nehru Then Too There Difficulty Dont Understand This Fear Pm Modi Pt Nehru In Parliament

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..