दुसऱ्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर झाले? तर आता घाबरू नका...

वृत्तसंस्था
Sunday, 8 September 2019

- ट्रान्सफर झालेले पैसेही येणार मिळवता

 

नवी दिल्ली : सध्या ऑनलाईन पैसे ट्रान्सफरचे प्रमाण वाढत आहे. एखाद्या बँक खात्याऐवजी चुकून इतर बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचे आपण ऐकले असेलच. ट्रान्सफर झालेले पैसे अनेकदा परत मिळतात तर कधी मिळतही नाही. मात्र, आता चुकून ट्रान्सफर झालेले पैसे परत मिळू शकतात. 

इंटनेट बँकिंग, यूपीआयसह इतर माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले जात आहेत. मात्र, या ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करताना घाईगडबडीत चुकीचा अकाऊंट नंबर टाकला जातो. त्यामुळे पैसे ट्रान्सफर झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, एकदा ट्रान्सफर झालेले पैसे पुन्हा परत मिळवता येऊ शकतात.

असे मिळवता येतील पैसे

- पैसे ट्रान्सफर झाल्यास संबंधित खातेधारकाकडून याबाबतची माहिती करून घ्यावी, की त्यांना पैसे मिळाले आहेत की नाही. जर पैसे मिळाले नसेल तर याची माहिती घ्यावी. त्यानंतर बँकेला याबाबत त्वरीत माहिती द्यावी. त्यामध्ये पैसे कधी ट्रान्सफर झाले, त्याची तारीख आणि वेळ खाते क्रमांक आणि चुकून ज्या खात्यावर ट्रान्सफर झाला याची माहिती द्यावी. 

- जर काही तांत्रिक कारणांमुळे पैसे चुकून इतरांना ट्रान्सफर झाले असतील ते IFSC कोडच्या माध्यमातून पैसे पुन्हा मिळवता येऊ शकतील. त्यासाठी काही वेळ लागू शकतो. जर पैसे परत आले नाही तर संबंधित बँक शाखेत जाऊन शाखा व्यवस्थापकाशी भेट घेऊन याची माहिती द्यावी. जर चुकून पाठवलेली रक्कम आपल्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेतून ट्रान्सफर केल्यास पैसे सहज मिळू शकतील. 

- दुसऱ्या बँक खात्यातील खातेदाराला रक्कम मिळाल्यास पैसे मिळवण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. त्या बँकेच्या शाखेशी चर्चेनंतर पैसे मिळायची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you sent money in wrong account number then find return this way