UIDAI : आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; UIDAI ने जारी केली नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aadhaar card

UIDAI : आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी; UIDAI ने जारी केली नोटीस

आधार वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत कामाची बातमी आहे. कारण, भारतात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. याशिवाय कोणतेही सरकारी आणि गैर-सरकारी काम होऊ शकत नाही. वेळोवेळी UIDAI तर्फे नागरिकांसाठी सूचना देण्याचे काम करत असते. यावेळीदेखील UIDAI ने एक महत्त्वाची नोटीस जारी केली आहे.

तुमचे आधार कार्ड देखील 10 वर्षे जुने आहे का?जर होय, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) एक नोटीस जारी केली आहे. ज्यामध्ये ज्या नागरिकांनी 10 वर्षांपूर्वी त्यांचे आधार कार्ड बनवले होते. अशा नागरिकांना त्यांची कागदपत्रे आणि तपशील अद्यतनित करण्यास सांगण्यात आले आहे.

UIDAI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करण्याचे काम ऑनलाइन किंवा आधार केंद्रांना भेट देऊन केले जाऊ शकते. मात्र, माहिती अपडेट करणे बंधनकारक करण्यात आलेले नाही. निवेदनानुसार, ज्या व्यक्तींनी दहा वर्षांपूर्वी आधार कार्ड काढले आणि अशा व्यक्तींना दस्तऐवज अद्यतनित करण्याची विनंती करण्यात आली आहे.

कसे कराल अपडेट?

UIDAI ने म्हटले आहे की, आधार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अपडेट करता येणार आहे. ऑनलाइन अपडेट करण्यासाठी तुम्हाला पहिले MyAadhaar पोर्टलला भेट द्यावी लागेल. याशिवाय अपडेशनचे हे काम तुम्ही ऑफलाईन म्हणजे आधार केंद्रावर जाऊनही करता येणार आहे. याअपटेशनच्या कामासाठी आधारधारधारकाला काही शुल्क भरावे लागणार आहे.