

IFFI 2026 Showcases Goan Creativity Through 12 Konkani Films and Short Films in the Konkani Cinema Section
sakal
-जयदीप पाठकजी
पणजी : देश-विदेशातील विविध विषयांवरचे चित्रपट ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवले जात आहेतच. त्याचबरोबर कथेतर अर्थात ‘नॉन फीचर फिल्म’ विभागात वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपट पाहायला मिळत आहे. गोव्यातील तरुण दिग्दर्शकांचे लघुपट पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह देशभरातील रसिक गर्दी करीत आहेत. मानवी भावभावना, सामाजिक रूढी, कौटुंबिक परंपरा, नात्यांमधील गुंतागुंत आणि बदलत्या काळातील मानसिक संघर्ष अशा विविध विषयांना हात घालत गोव्याच्या नव्या पिढीने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.