IFFI 2026 : गोव्यातील ५७ व्या इफ्फीमध्ये ईशान्य भारताच्या चार चित्रपटांना स्थान; न्यीशी भाषेतील ‘उरुम’ने इंडियन पॅनोरमा विभागात वेधले रसिकांचे लक्ष

IFFI 2026 showcases Northeast Indian films, Nyishi cinema and tribal culture : ईशान्य भारतातील चार चित्रपटांचा ५७ व्या इफ्फीमध्ये समावेश; न्यीशी भाषेतील ‘उरुम’ चित्रपटाचे इंडियन पॅनोरमा विभागात प्रदर्शन; आदिवासी संस्कृती, परंपरा, संघर्ष आणि सामाजिक वास्तवाचे संवेदनशील चित्रण रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले.
Nyishi cinema and tribal culture

Nyishi cinema and tribal culture

esakal

Updated on: 

जयदीप पाठकजी

पणजी : गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध देशांमधील चित्रपट दाखवले जात आहेतच. मात्र, महोत्सवात भारताच्या विविध भागांतील आशय-विषयांचे सिनेमेही पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ईशान्येकडील राज्यांचे निसर्गसौंदर्य, तेथील परंपरा आणि सांस्कृतिक वैविध्य यांची नेहमीच चर्चा होते. मात्र, या प्रदेशातील माणसांच्या जगण्यातील संघर्ष, आदिवासी समाजाच्या स्मृती, बदलते सामाजिक वास्तव चित्रपटांतून फारसे समोर येत नाहीत. मात्र, यंदाच्या ‘इफ्फी’त ईशान्य भारतातील चार चित्रपटांचा समावेश करण्यात आला असून, इंडियन पॅनोरमा विभागात शनिवारी (ता. २१) संध्याकाळी ‘न्यीशी’ भाषेतील ‘उरुम’ हा चित्रपट दाखविण्यात आला. या विभागात निवड झालेला हा पहिलाच चित्रपट ठरला असून, चित्रपटाचे दिग्दर्शक दुयू तब्यो आणि चित्रपटातील कलाकार यावेळी उपस्थित होते.

Loading content, please wait...