

Kashi
esakal
धार्मिक नगरी वाराणसीमध्ये मंदिरे आणि घाटांवर दररोज जमा होणाऱ्या निर्माल्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. आयआयटी बीएचयूच्या जैवरासायनिक अभियांत्रिकी विभागातील संशोधकांनी फुलांच्या कचऱ्यापासून बायो-सीएनजी, सेंद्रिय खत आणि हवनासाठी लागणारे साहित्य तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
या संशोधनाला १० जुलै २०२६ रोजी भारत सरकारने पेटंट मंजूर केले असून, त्याची भारतीय पेटंट क्रमांक IN595095 B1 अशी नोंद करण्यात आली आहे.