आयआयटी गुवाहाटीने शोधला ‘एसी’ला पर्याय

रेडिएटिव्ह शीत प्रणालीची निर्मिती करण्यात यश, विजेची गरज नाही
IIT Guwahati come up with alternative to AC radiative cooling system no electricity required
IIT Guwahati come up with alternative to AC radiative cooling system no electricity requiredsakal

नवी दिल्ली : गुवाहाटीतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’मधील संशोधकांनी वातानुकूलित यंत्राला पर्याय ठरू शकेल, अशा रेडिएटिव्ह कुलर कोटिंग मटेरिअलचा आराखडा तयार केला असून त्यासाठी विजेची देखील गरज भासणार नाही. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार हे मटेरिअल म्हणजे विद्युतमुक्त शीतप्रणाली आहे तिचा वापर छतावर देखील करता येतो. दिवसा आणि रात्री तिचा प्रभावीपणे वापर करणे सहज शक्य आहे. पॅसिव्ह रेडिएटिव्ह कुलिंग प्रणाली सभोवतालच्या वातावरणातील उष्मा इन्फ्रारेड रेडिएशनच्या माध्यमातून शोषून घेते आणि त्यानंतर त्याच उष्म्याचे उत्सर्जन देखील केले जाते. यामुळे ज्या ठिकाणी ही प्रणाली बसविण्यात आली आहे ती जागा पूर्णपणे थंड होण्यास मदत होते.

सर्वाधिक पॅसिव्ह रेडिएटिव्ह कुलर हे केवळ रात्रीच वापरण्यात येतात. दिवसामात्र या कुलरला काम करण्यासाठी सगळ्या सौर किरणांना परावर्तित करावे लागते, असे आयआयटी गुवाहाटीमधील संशोधक आशिषकुमार चौधरी यांनी सांगितले. आतापर्यंत काही कुलिंगप्रणाली या दिवसा पुरेशाप्रमाणामध्ये थंडावा निर्माण करत नसल्याचे आढळून आले होते. आम्ही हीच समस्या ध्यानात घेऊन परवडणारी आणि अधिक प्रभावी अशी प्रणाली तयारी केली असून ती चोवीस तास काम करू शकते असे या संशोधकांचे म्हणणे आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ फिजिक्स डी ः अप्लाईड फिजिक्स’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com