esakal
कानपूर (उत्तरप्रदेश) : देशातील अनेक आघाडीचे तंत्रज्ञ, संशोधक आणि नवउद्योजकांना घडविणारी अग्रगण्य संस्था म्हणून आयआयटी कानपूरला ओळखले जाते. आता हीच संस्था चर्चेत आली आहे ती तिच्या माजी विद्यार्थ्यांच्या (IIT Kanpur Alumni) दातृत्वामुळे. या संस्थेमध्ये धडे गिरविणाऱ्या २००० सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या तुकडीने चक्क शंभर कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे.