
IIT Madras : पवईनंतर मद्रास IIT हादरलं; द्वितीय वर्षात शिकणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्याची आत्महत्या
पवई आयआयटीत बी.टेकच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वसतिगृहात रविवारी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता आयआयटी मद्रासमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या करत जीवन संपले आहे.
वसतिगृहात गळफास घेत आत्महत्या केलेला विद्यार्थी महाराष्ट्रातील असून, तो IIT मद्रास येथे द्वितीय वर्षात शिकत होता. ही आत्महत्या तणावातून केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, संबंधित विद्यार्थी IIT मद्रासमध्ये कोणत्या अभ्यासक्रमाचा होता तसेच तो कुठला रहिवासी होता याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कोट्टूरपुरम पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चेन्नईतील थरमणी येथे IIT मद्रासचा कॅम्पस आहे. याठिकाणी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या श्रीवान सनी नावाच्या विद्यार्थाने मंगळवारी वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली.
आत्महत्या केलेली विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून तणावाखाली होती. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊलं उचलल्ल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास कोट्टूरपुरम पोलीस करत आहेत.
पवई आयआयटीत बी. टेकच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
पवई आयआयटीत बी.टेकच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वसतिगृहात रविवारी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. हा विद्यार्थी वसतिगृहात रहात होता. आयआयटी पवईच्या वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. पवई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केली आहे.