बाजारात आली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी साडी; पाहा किंमत

टीम ई सकाळ
Thursday, 3 September 2020

विविध प्रकारची औषधे, व्यायाम, रोगप्रितकारक शक्ती वाढविणाऱ्या आयुर्वेदिक गोळ्या असे चालूच असताना आता बाजारात रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारी साडी आली आहे.

भोपाळ : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आपली रोगप्रितकारक शक्ती (Immunity Boosting) वाढवणारी नवनवीन औषधे बाजारात येत आहे. तसेच नवनवीन गोष्टी आपण कोरोनाशी सामना करण्यासाठी करत आहोत. विविध प्रकारची औषधे, व्यायाम, रोगप्रितकारक शक्ती वाढविणाऱ्या आयुर्वेदिक गोळ्या असे चालूच असताना आता बाजारात रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारी साडी आली आहे. या साडीचे नाव आयुर्वस्त्र असे आहे. या साडीची किंमत ही ३ हजार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयुर्वस्त्र साडी ही मध्यप्रदेशातील भोपाळ (Bhopal) आणि इंदोर (Indore) या शहरात सध्या विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. आयुर्वस्त्र साडीला पुर्णपणे हर्बल पद्धतीने बनविण्यात आले आहे. दालचिनी, काळी मिरची, विलायची, चक्रफूल, लवंग या सर्व गोष्टींपासून एक मिश्रण तयार केले जाते. त्या मिश्रणाची वाफ तयार करून तिची वाफ या साडीला देण्यात येत असल्याचे साडीच्या निर्मात्यांनी सांगितले आहे.

साडीची सर्व प्रोसेस झाल्यानंतर साडी तयार होते. साडी बनवून तयार झाल्यावर या मिश्रणाची वाफ देण्याचे काम करण्यात येत असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. या साडीमुळे कोरोनाचा रुग्ण बरा होत नसला तरी कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी या साडीमुळे रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास मदत होत असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.

दरम्यान, भारतात कोरोनाचा एक प्रकारे उद्रेक झाल्याचे दिसून येत असून काल (ता. ०२) एका दिवसात ८२ हजार ८६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण आता ८ लाखांच्या वर गेली आहे. देशात आता एकूण ८ लाख १३ हजार ४८९ एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर भारतातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता ३८ लाख ४८ हजार ९६८वर पोहोचला आहे. मागील २४ तासांत देशात १०२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण एकूण मृत्यूंचा आकडा आता ६७ हजार ४८६ वर पोहोचला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immunity Booster Sarees available in market

Tags
टॉपिकस
Topic Tags: