'गायींना मारणारा नरकात सडण्यास पात्र'; High Court ची महत्वपूर्ण टिप्पणी, केंद्राला दिला 'हा' आदेश I Cow | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Allahabad High Court

'जो कोणी गायींना मारतो किंवा इतरांना मारण्याची परवानगी देतो, तो नरकात सडलेला समजला जातो'.

Cow : 'गायींना मारणारा नरकात सडण्यास पात्र'; High Court ची महत्वपूर्ण टिप्पणी, केंद्राला दिला 'हा' आदेश

लखनौ : आम्ही धर्मनिरपेक्ष देशात राहतो आणि तिथं सर्व धर्मांचा आदर असायला हवा. हिंदू धर्मात (Hinduism) गाय ही दैवी आणि नैसर्गिकरित्या कल्याणकारी आहे, असं मानलं जातं.

म्हणूनच, गायीचं संरक्षण आणि पूजा केली पाहिजे, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठाचे न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी केलीये. लखनौ खंडपीठानं केंद्र सरकारला (Central Government) गायीला (Cow) 'संरक्षित राष्ट्रीय प्राणी' म्हणून घोषित करून गोहत्या बंदीसाठी कायदा तयार करण्यास सांगितलंय.

टाइम्सच्या वृत्तानुसार, 14 फेब्रुवारीला न्यायमूर्ती शमीम अहमद (Justice Shamim Ahmed) यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठानं पुराणाचा हवाला दिला आणि म्हटलं की, 'जो कोणी गायींना मारतो किंवा इतरांना मारण्याची परवानगी देतो, तो नरकात सडलेला समजला जातो'. न्यायमूर्ती शमीम अहमद यांच्या एकल खंडपीठानं हा निकाल दिला.

उत्तर प्रदेश गोहत्या प्रतिबंधक कायदा, 1955 च्या संदर्भात याचिकाकर्त्यावर दाखल करण्यात आलेली फौजदारी कारवाई रद्द करण्याची मागणी करणारी बाराबंकीच्या मोहम्मद अब्दुल खालिक यांनी दाखल केलेली 14 फेब्रुवारी 2023 रोजीची याचिका फेटाळताना हा निकाल देण्यात आला.

न्यायालयानं 14 फेब्रुवारीला दिलेल्या आदेशात म्हटलंय, 'गाय विविध देवी-देवतांशी संबंधित आहे. विशेषतः भगवान शिव (ज्याचं वाहन नंदी आहे), भगवान इंद्र (कामधेनू गायीशी संबंधित आहे), भगवान कृष्ण (जे लहानपणी गायी चरवायचे) आणि सामान्य देवता आहे, असं नमूद करण्यात आलंय.