esakal | न्यूजक्लिक, न्यूजलाँड्री माध्यमसंस्थांवर आयकर विभागाचा 'सर्व्हे'
sakal

बोलून बातमी शोधा

न्यूजक्लिक, न्यूजलाँड्री माध्यमसंस्थांवर आयकर विभागाचा 'सर्व्हे'

न्यूजक्लिक, न्यूजलाँड्री माध्यमसंस्थांवर आयकर विभागाचा 'सर्व्हे'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली: आयकर विभागाने आज शुक्रवारी न्यूज क्लिक आणि न्यूजलाँड्री या दोन मीडिया पोर्टल्सवर धाड टाकली आहे. या पोर्टल्सच्या करप्राप्तीचे तपशील तपासण्यासाठी ही धाड टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. याआधी न्यूजक्लिकच्या कार्यालयावर ईडीकडूनही फेब्रुवारी महिन्यात धाड टाकण्यात आली होती. तसेच यापूर्वी जुलै महिन्या भास्कर माध्यम समूहावर देखील आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आली होती.

मात्र, याला आयकर विभागाने 'छापेमारी' न म्हणता 'सर्व्हे' म्हटलं आहे. याबाबत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयाला भेटी दिल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. प्रेस ट्रस्ट इंडिया या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितलंय की, विविध करांच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी आणि संस्थांनी दिलेल्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी हा सर्व्हे केला गेला.

loading image
go to top