भारत-पाक सीमेवर वाढत आहे मुस्लिमांची संख्या

वृत्तसंस्था
शनिवार, 1 डिसेंबर 2018

जैसलमेर : राजस्थान राज्यातील जैसलमेर जवळील पाकिस्तान सीमारेषेजवळ मुस्लिम लोकांची संख्या वाढत असल्याने सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चिंता व्यक्त केली. अन्य समाजाच्या तुलनेत मुस्लिमांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याची माहिती बीएसएफने दिली. या भागात मुस्लिमांच्या संख्येत 22 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली असून इतर समाजाच्या संख्येत 8 ते 10 टक्क्यानेच वाढ झाली आहे. 

बीएसएफने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली. बीएसएफने भारत-पाक सीमेवरील गावांचे सर्वेक्षण केले होते. या गावांतील लोकांमध्ये राजस्थानी संस्कृती कुठेही दिसून येत नाही. त्यांच्या वेशभूषेतही ती कुठे अढळत नाही. तसेत नमाज अदा करायला जाणाऱ्या युवकांची संख्याही वाढली असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

मुस्लिमांच्या या वाढत्या संख्येमुळे बीएसएफने संरक्षण मंत्रालयाला सतर्क राहण्याची सूचना केली आहे. पण असे असूनही अद्याप या लोकांमधून देशविरोधी कारवाया किंवा पाकिस्तानबाबत प्रेम असल्याचे अढळून आले नाही. येथील हिंदू-मुस्लिम समाजात एकोपा दिसतो, असेही बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: increase number of muslims at India Pakistan Border