चिंता वाढली! 'या' महिन्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट

देशात कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे.
Corona Fight
Corona Fightsakal
Updated on

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा (Corona) वेग काहीसा मंदावला आहे. त्यामुळे जनजीवन पुर्वपदावर येतांना दिसत आहे. मात्र आता पुन्हा देशात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट(Third wave) येणार असल्याचे मत तंज्ञ मंडळी देत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने (MHA) स्थापन केलेल्या समितीचे म्हणणे आहे की, भारतात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोंबर (Octomber) दरम्यान येऊ शकते. त्यामुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीने पंतप्रधान कार्यालयाला (PMO) कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेविषयी माहिती दिली आहे. त्यात देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोंबर दरम्यान येऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याबरोबरच डॉक्टर, कर्मचारी, व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिकेसारखी उपकरणे देखील सज्ज ठेवली पाहिजे. असे आपत्ती व्यवस्थापन समितीने पंतप्रधान कार्यालयास सांगितले आहे.

Corona Fight
अफगाण घडामोडी: पंतप्रधानांची परराष्ट्र मंत्रालयाला महत्त्वाची सूचना

याआधी एसबीआयच्या रेस टू फिनिशिंग लाईन या संस्थेने केलेल्या रिसर्चमध्ये कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येणार असल्याचं मत व्यक्त केलं होतं. दरम्यान भारतात कोरोना या भयावह विषाणूनं आतापर्यंत 3,24,49,306 जणांना ग्रासलं आहे. तर 4,34,756 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांच्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या 3,33,924 जणांवर देशातील विविध भागात उपचार सुरु आहेत. सध्या देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 97.63 टक्के इतका असून, आतापर्यंत देशाभरात सुमारे 58.25 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com