Mizoram Myanmar border security increased : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मिझोराम-म्यानमार सीमेवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. कुंपण नसलेल्या सीमेपासून दहा किलोमीटर अंतरावर नागरिकांना एकमेकांना भेटण्यासाठी सीमा पास अनिवार्य केला आहे.
ऐजॉल : केंद्र सरकारच्या निर्देशानंतर ५१० कि.मी.च्या मिझोराम-म्यानमार सीमेवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून कुंपण नसलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून दहा कि.मी.च्या अंतरातील नागरिकांना एकमेकांना भेटण्यासाठी आता सीमा पासची गरज असेल.