Video: IND vs AUS तिकीट खरेदीसाठी प्रेक्षकांची झुंबड; पोलिसांचा लाठीचार्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video: IND vs AUS तिकीट खरेदीसाठी प्रेक्षकांची झुंबड; पोलिसांचा लाठीचार्ज

हैद्राबाद : हैद्राबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा T20 सामना होणार आहे. या सामन्याचे तिकीटे खरेदीसाठी प्रेक्षकांची हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर झुंबड उडाली असून पोलिसांनी प्रेक्षकांच्या गर्दीवर लाठीचार्ज केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन T20 सामन्यातील उद्या दुसरा सामना असून तिसरा सामना हैद्राबाद येथे होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. २०९ धावांचे आव्हान देऊनही पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर उद्या दुसरा सामना होत असून यामध्ये कुणाचा विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

भारतीय संघ आता शुक्रवारी दुसऱ्या टी-20 सामन्यात नागपुरमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत नागपुरातील पुढील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा विचार करू शकतात, असेही मानले जात आहे. त्याचबरोबर जसप्रित बुमराह येणाऱ्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Ind Vs Aus Match Hydrabad Audience Police Baton Charge

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..