Independence Day 2023: खरं की काय! भारतातल्या या किल्ल्यावरून दिसतो अख्खा पाकिस्तान देश

कुतुब मिनार पेक्षाही जास्त उंची असलेल्या किल्ल्याचे बांधकाम कसे झाले
Independence Day 2023
Independence Day 2023esakal

Independence Day 2023: आपल्या देशात जगभरात विविधतेने नटलेला देश म्हटलं जातं. कारण, आपल्या देशात अनेक जाती धर्माचे, प्रांताचे लोक राहतात. त्यामुळे देशातील ऐतिहासिक ठेवाही विभिन्न समाजांचे प्रतिनिधित्व करतो. आज स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आपण एक ऐतिहासिक किल्ल्याबद्दल माहिती घेऊयात.

हा किल्ला राजस्थानमध्ये असून त्याचे नाव मेहरानगड असे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच प्रकारच्या एका किल्ल्याबद्दल सांगणार आहोत. या किल्ल्यावरून पाकिस्तान देश दिसतो, असंही म्हटलं जातं. तसंच या किल्ल्याचा आठव्या दरवाजाचाही मोठा इतिहास आहे.

हा किल्ला १४६० मध्ये बांधण्यात आला होता. महाराज राव जोधा यांनी मेहरानगढ किल्ल्याची उभारणी केली. जोधपुर शहरापासून ४१५ मीटर उंचीवरील हा किल्ला मोठ्या भिंतीमुळे अभेद्य बनला आहे.

Independence Day 2023
Independence Day 2023: स्वातंत्र्य दिवसाच्या 'अशा' द्या खास शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

मेहरानगढ हा किल्ला जोधपूर शहरातील कोणत्याही भागातून दिसून येतो. शहरातील उंच टेकडीवर हा किल्ला बांधला असून अतिशय पुरातन बांधकाम आहे. अतिशय उंच भिंती अभेद्य तटबंदी. किल्ल्याच्या भिंती ३६ मीटर उंच आणि २१ मीटर रुंद आहेत. किल्ला वास्तुरचनेचे अतिशय उत्तम् उदाहरण. येथून शहराचे विहंगम दृश्य दिसते

कसा उभारला किल्ला

राव जोधा यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांना मण्डोर राज्य सोडावे लागले. 15 वर्ष ते मेवाडच्या फौजांसोबत एकाकी झुंज देत होते. 1453 मध्ये मण्डोरवर त्यांचे अधिराज्य पुन्हा स्थापन झाले. त्यांना आपल्या राजधानीसाठी एका किल्ला उभारायचा होता.

त्याच दरम्यान त्यांनी एका ठिकाणी बकरीला वाघासोबत लढताना पाहिले आणि त्यांनी निश्चय केला की येथेच आपला किल्ला उभा राहिल. जोधपूरचा मेहराणगड किल्ला 120 मीटर उंचीवरील डोंगरावर बांधण्यात आला होता. या किल्ल्याची उंची दिल्लीतील कुतुब मिनार (73 मीटर) पेक्षा जास्त आहे.(Independence Day 2023)

Independence Day 2023
Independence Day : लाल किल्ल्याजवळ पुरण्यात आलेले टाइम कॅप्सूल म्हणजे काय? वर्षानुवर्षे यावर चाललाय वाद

आठ दरवाज्यांचा हा किल्ला टोलेगंज इमारतींनी घेरलेला आहे. या किल्ल्याचे सातच दरवाजे आहेत. पण या किल्ल्यात आठवा रहस्यमय दरवाजाही असल्याचं म्हटलं जातं. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दरवाजाला खिळे लावण्यात आले आहेत. हत्तींच्या हल्ल्यापासून बचाव व्हावा, यासाठी दरावाज्यांना खिळे लावण्यात आले होते.

किल्ल्यात अनेक मोठे महल, अद्भूत नक्शीदार दरवाजे आणि जाळीदार खिडक्या बनवलेल्या आहेत. यामध्ये मोती महल, शीश महल, फूल महल, सिलेह खाना आणि दौलत खाना आहे. किल्ल्याजवळ चामुंडा मातेचा एक मंदिर आहे, ज्याला १४६० मध्ये राव जोधा यांनी बांधलं होतं.

सलमान खानच्या 'हम साथ साथ है' चित्रपटाचे चित्रीकरण मेहरानगढ किल्ल्यावर झाले आहे. ख्रीश्चीयान बाले याने अभिनित केलेल्या 'The Dark Night Rises' या चित्रपटातील विहिरीचे चित्रण याच किल्ल्यामधील आहे. सुशांत राजपूतचा 'शुद्ध देसी रोमान्स', १९९४ सालची 'the Jungle Book' ही हॉलीवूड फिल्म मेहरानगढ किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रित झाले आहेत (India)

Independence Day 2023
Independence Day 2023: स्वातंत्र्यदिन खास बनवायचा आहे ना? मग या टिप्स वापरून मेकअप करून पाहाच!

या किल्ल्यातून दिसतो पाकिस्तान

होय, या किल्ल्याच्या टोकावर उभं राहिल्यास पाकिस्तानही बॉर्डर दिसते. याचं कारण म्हणजे दिल्ली दरबारी असलेला कुतूबमिनार पेक्षाही अधित उंच हा किल्ला आहे. त्यामूळे इथून संपूर्ण पाकिस्तानची झलकच दिसते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com